Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली प्रत्यक्ष पिकाची पाहणी – अधिकाऱ्यांनी केली शेतावरच १३० किलो खरबूजची खरेदी

admin by admin
27/03/2021
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लोहारा तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन भेट देत पाहणी करून शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तर या पाहणी दरम्यान शेतकऱ्याच्या शेतातील खरबुजची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट खरेदी केली. तालुक्यातील कृषी कामासंदर्भात दि.२४ रोजी मासिक चर्चासत्र घेण्यात आले.
या प्रक्षेत्र भेटीमध्ये लोहारा तालुक्यातील दस्तापूर येथील शेतकरी महेश डोंगरे यांनी सुरू केलेल्या मशरूम प्रकल्पाची पाहणी करून त्यांना विपणन संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तर हा प्रकल्प करण्यासाठी इच्छूक असलेल्या शेतकऱ्यांनी महा डीबीटी या पोर्टलवर अर्ज करावा असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत अवजारे बँकेची पाहणी करून शेतकरी गटातील शेतकऱ्यांना अवजारे बँक वापर आणि त्याचे अभिलेखे ठेवण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तालुक्यातील जेवळी येथे बसवराज वलदोडे यांच्या शेतावर सिताफळ लागवड व त्याची निगा यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मोघा बु येथील भुजंग महादेव साबळे यांच्या फळबागेची पाहणी करून पेरु लागवड व त्याची छाटणी कशी करावी याविषयी कृषी विज्ञान केंद्राचे गणेश मंडलिक यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. शिवाजी जाधव यांच्या फुल शेतीस भेट देऊन पाहणी करीत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाण्याच्या काटेकोरपणे वापर करण्यात यावा यासाठी पोखरा योजने अंतर्गत शेततळे, अस्तरीकरण व ठिबक सिंचन पद्धतीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी केले. तसेच हिप्परगा रवा येथील विजयकुमार कुलकर्णी यांच्या आंबा बागेची पाहणी करून किड व रोग संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
प्रक्षेत्र भेटी नंतर लोहारा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मासिक चर्चासत्र घेण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील पीक परिस्थिती व त्यावरील उपाययोजना या संदर्भात कृषी विद्यावेत्ता वसंत सूर्यवंशी व हवामान तज्ञ एस.एल. हरवाडीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कृषी अधिकाऱ्यांनी केली १३० किलो खरबुजाची खरेदी !

विकेल ते पिकेल या संकल्पने अंतर्गत तालुक्यातील नागराळ येथील गणेश गोरे यांच्या भाजीपाला स्टॉलला छत्री भेट देऊन त्यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकाऱ्यांनी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अंतर्गत १३० किलो खरबूज खरेदी केले. त्यामुळे शेतकऱ्यांनाही आपला माल विक्री करण्यासाठी इतरत्र जाण्याची गरज भासली नाही. तर व्यापाऱ्याची होत असलेली मध्यस्थी यामुळे टळण्यास मदत झाल्याने शेतकऱ्यांना देखील याचा आर्थिक फायदा होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी थेट शेतकऱ्याकडूनच माल विकत घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, बजरंग मंगरूळकर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, ज्ञानेश्वर जाधव, सुनील जाधव, नामदेव गायकवाड, महारुद्र मोरे, बी.बी. जाधव, संजय गायकवाड, संतोष कोयले व तालुक्यातील कृषी सहाय्यक आदी उपस्थित होते.

Previous Post

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली उमरगा व लोहारा तालुक्यातील विविध ठिकाणची पाहणी

Next Post

लोहारा तालुक्यातील जेवळी( दक्षिण) येथे दहा दिवसीय गळीत धान्य व कडधान्य प्रक्रिया प्रशिक्षण संपन्न

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

लोहारा तालुक्यातील जेवळी( दक्षिण) येथे दहा दिवसीय गळीत धान्य व कडधान्य प्रक्रिया प्रशिक्षण संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's