वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
नानाजी देशमुख कृषीसंजीवनी योजना ( पोखरा) या योजनेत कोराळ गावचा समावेश करण्यात यावा अशी मागणी लोककल्याण बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विक्रम दासमे यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, उमरगा तालुक्यातील कोराळ या गावचा नानाजी देशमुख कृषीसंजीवनी योजना ( पोखरा) या योजनेत समावेश नसल्याने गावातील शेतकरी कृषी विभागाच्या अनेक योजनांपासून वंचित राहत आहेत. कोराळ हा अवर्षणग्रस्त व दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कोराळ गावचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत ( पोखरा ) समावेश करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.