वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेने लोहारा पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवारी (दि. २०) धरणे आंदोलन केले.
लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांची बदली करण्याची मागणी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक संघटनेकडून मागील अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. सरपंच, ग्रामसेवक संघटनेकडून त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. त्यानंतर गटविकास अधिकारी सोपान अकेले यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर काही दिवस गटविकास अधिकारी अकेले रजेवर गेले होते. परंतु काही दिवसांनी ते पुन्हा जॉईन झाले. त्यानंतर पुन्हा एकदा ग्रामसेवक संघटनेने आंदोलनास्त्र उपसले आहे. लोहारा पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामसेवक संघटनेने सोमवारी (दि.२०) धरणे आंदोलन केले. या आंदोलनात ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एम. टी. जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कारभारी, सय्यद, डी. पी. पवार, जी.डी. कोकाटे,आर.एन. वाघमारे, एस.एम. मुंडे, एन.एफ. दबडे, एम. के. बनशेट्टी, ए.बी. भोरे, एच.डी.कारभारी, एस.एस. भुसे, ए.सी. मोरे, जी.टी. इंगळे, एम.व्ही. कदम, एस. एन. मातोळे यांच्यासह ग्रामसेवक सहभागी झाले होते.