मुरूम प्रतिनिधी : पारंपारिक शिक्षण प्रणालीबरोबरच व्यवसायाभिमुख शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण पत्रकारिता, अंगणवाडी-बालवाडी सेविका प्रशिक्षण, ब्युटी पार्लर, संवाद कौशल्य यासारखे अभ्यासक्रम शिकणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. किरणसिंग राजपूत यांनी केले.
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद अंतर्गत आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागामार्फत ग्रामीण पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मंगळवारी (ता. १५) ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. या अभ्यासक्रमासाठी ४० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्याचा एकूण निकाल ९५ टक्के लागला. त्यात कुमारी शितल पाताळे (प्रथम), मनोज हावळे (द्वितीय) क्रमांक पटकाविला. या यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत औरंगाबाद येथे घेण्यात आलेल्या विभागीय क्रीडा महोत्सवात माधवराव पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी पवन शेंडगे यांनी लांब उडी, १०० मीटर धावणे, भालाफेक, गोळाफेक, ४ बाय १०० मीटर रिले या पाच क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. सुजाता मुके, अजिंक्य कांबळे, अमोल कटके यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक राम कांबळे म्हणाले की, पत्रकार हा निर्भीड व रोखठोक असला पाहिजे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांनी आपल्या लेखणीतून अन्याय-अत्याचाराला वाचा फोडली पाहिजे. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य अशोक सपाटे म्हणाले की, पत्रकारांनी वास्तवतेचे भान ठेवून लेखन करावे. त्यांच्या लेखणीतून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा दूर होऊन सजग नागरिक तयार झाले पाहिजे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेऊनही अनेक चांगले खेळाडू घडू शकतात. व्यवसाय व नोकरी करत-करत निरंतर शिक्षण घेऊ शकतात आणि आपले व महाविद्यालयाचे नाव उज्वल करू शकतात. यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सायबण्णा घोडके, समन्वयक डॉ. प्रकाश कुलकर्णी, डॉ. सोमनाथ बिरादार, डॉ. नरसिंग कदम, डॉ. विलास खडके, डॉ. अरुण बाबा, डॉ. महादेव कलशेट्टी, डॉ. सुजित मटकरी, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. रवींद्र आळंगे, डॉ. रवींद्र गायकवाड, प्रा. गोपाळ कुलकर्णी, प्रा. दयानंद बिराजदार आदींची उपस्थिती होती. सकाळ यिन केंद्रीय कॅबिनेट रोजगार समिती संघटकचे योगेश पांचाळ, संकेत इंगोले, कुमारी शुभांगी कुलकर्णी, पुजा शिंदे, प्रगती कुलकर्णी, वैभव शिंदे, अजिंक्य राठोड, पृथ्वीराज गव्हाणे, वशिम शेख, सतिश महिंद्रकर, समीर शेख, बाळराजे राठोड आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार अंबिका पाताळे यांनी मानले. यावेळी विविध शाखेचे बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.