Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

जिजाऊ ब्रिगेडच्या उस्मानाबाद जिल्हा प्रवक्ता रेखाताई नितीन सूर्यवंशी यांच्या शिवशाही या काव्यसंग्रहाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते शिवनेरीवर प्रकाशन !

by admin
in महाराष्ट्र
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
दि. १९ फेब्रुवारी २०२१ ला दरवर्षीप्रमाणे किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात जिजाऊ ब्रिगेडच्या उस्मानाबाद जिल्हा प्रवक्ता रेखाताई नितीन सूर्यवंशी यांच्या शिवशाही या काव्यसंग्रहाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

\"\"

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री मा. अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, डॉ. अमोल कोल्हे, आमदार विनायक मेटे, अतुल बेनके, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, आयुष प्रसाद, निर्मला पानसरे, श्याम पांडे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, राजू डुबल, रवींद्र भुट्टे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पाळणा म्हणून शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रेखाताई सूर्यवंशी यांनी जिजाऊ वंदना गायली. यानंतर शिवनेरी भूषण पुरस्कार व शिवाजी महाराज गौरव पुरस्कार देण्यात आले. मुख्य कार्यक्रमामध्ये जिजाऊ ब्रिगेड उस्मानाबाद जिल्हा प्रवक्ता रेखाताई नितीन सूर्यवंशी यांच्या \”शिवशाही\” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्वांनी पुस्तकाचे भरभरून कौतुक केले.
शिवशाही काव्यसंग्रह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची गौरवगाथाच आहे. या पुस्तकास मा. पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांची विस्तृत, अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी प्रतिक्रिया लाभली आहे. खेडेकर साहेबांनी रेखाताईच्या काव्याची तुलना महान मराठी ऐतिहासिक कवयित्रींच्या काव्याशी केली आहे. त्यांच्या मते हा काव्यसंग्रह विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय, मीडिया, चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवकीर्तनकार, प्रवचनकार या सर्वांसाठी निश्चितच पूरक आहे . या काव्यसंग्रहास प्रसिद्ध कवी डॉ. बालाजी मदन इंगळे यांची साजेसी प्रस्तावना आणि द यंग आंत्रपंन्योर विजेते शरद तांदळे यांची प्रतिक्रिया लाभली आहे. उस्मानाबादचे माजी खासदार मा. रवींद्र गायकवाड सर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. एकूणच हे पुस्तक सर्व शिवप्रेमी आणि अभ्यासकांसाठी अत्यंत प्रेरक ठरणार असल्याचे रेखाताई सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

Ad 2
Ad 1
Tags: प्रकाशन सोहळारेखाताई सूर्यवंशीशिवशाही काव्यसंग्रह
Previous Post

लोहारा पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेली वाहने कागदपत्रे दाखवून घेऊन जावीत – पोलीस निरीक्षक चव्हाण यांचे आवाहन

Next Post

उमरगा येथील मंजुषा ताई चव्हाण – पाटील यांना राज्यमंत्र्यांच्या हस्ते शिवभूषण पुरस्कार प्रदान

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

उमरगा येथील मंजुषा ताई चव्हाण - पाटील यांना राज्यमंत्र्यांच्या हस्ते शिवभूषण पुरस्कार प्रदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!