वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
५० व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात लोहारा तालुक्यातील तोरंबा येथील जय हनुमान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून माध्यमिक गटात त्यांच्या प्रयोगाचा प्रथम क्रमांक आला आहे.
तालुक्यातील तोरंबा येथील जय हनुमान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला होता. यात माध्यमिक गटात त्यांच्या प्रयोगाचा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला आहे. त्यामुळे त्यांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. शाळेतील विद्यार्थी वेदांत मसलगे व बसवराज बिराजदार यांच्यासह विज्ञान शिक्षक विनायक बंगले यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी गजानन सुसर, डायटचे प्राचार्य जटनुरे, उपशिक्षणाधिकारी श्री. मिरगणे विज्ञान पर्यवेक्षक काझी, श्री. थिटे, श्री. यमुनवाड, श्री. माळी तसेच विज्ञान मंडळाचे अध्यक्ष रवींद्र स्वामी, अजित साळूंके उपस्थित होते. या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम चव्हाण, सचिव प्रा. दिनकर बिराजदार, मुख्याध्यापक शाहूराज तावसे आदींनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.