वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जीप पडून झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वाशी तालुक्यातील पिंपळगाव (लिंगी) येथे शुक्रवारी (दि.१३) सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मृत शंकर बोरकर हे व्यवसायानिमित्त पुणे येथे वास्तव्यास होते. ते त्यांच्या गावी पिंपळगाव (लिंगी) येथे जात असताना स्वतः जीप चालवत होते. दरम्यान त्यांची जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळीच्या झाडाला धडकून ही अपघातग्रस्त जीप विहिरीत पडली. या अपघाताची माहिती मिळताच दळवेवाडी येथील नागरिकांनी घटनास्थळी येऊन विहिरीतून शंकर यास बाहेर काढले. त्यास वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. शंकर चा विवाह काही दिवसांपूर्वीच झाला होता. काळाने शंकर वर अशा प्रकारे घाला घातला. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.