दि. 29.06.2023 रोजी “ बकरी ईद ” ( ईद- उल- अझहा) हा सण साजरा होणार आहे. ईदच्यादिवशी मशीद, दर्गा, इदगाह इ. ठिकाणी मोठ्या प्रमाणात सामुदायीक नमाज पठाण करतात. नमाज पठाण केले नंतर कुर्बानीचा कार्यक्रम करतात बकरी ईद नंतर पुढील दोन(02) दिवस (बासी ईद, तिवासी ईद) दिनांक कुर्बानी चालते. तसेच दिनांक 29.06.2023 रोजी आषाढी एकादशी हे साजरी होणार आहे.
बकरी ईद व आषाढी एकादशीच्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रण (महसुल, पोलीस, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन, स्थानिक स्वराज्य संस्था इ.) दक्ष असुन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा पोलीस विभागकडुन आज पावेतो जिल्हास्थतरीय शांतता समितीची -01 सर्व प्रशासकीय विभाग-01, पोलीस मित्र व शांतता समिती -109, गोरक्षक-21, अशा बैठका घेवून जिल्ह्यात नमुद सण/उत्सव शांततेत पारपडावेत या दृष्टीने आवाहन करण्यात आलेले आहे.
जिल्हा पोलीस विभागाकडून जिल्ह्यातील 150 पेक्षा जास्त गावांना भेटी देण्यात आल्या असुन महत्वाचे एकुण 20 ठिकाणी पोलीस पथसंचलन(रुटमार्च) घेण्यात आलेले आहेत. नमुद सण/उत्सव शांततेत पारपडावे या करीता जिल्ह्यातील 500 पेक्षा जास्त गुंड उपद्रवी, समाजकंटक व गुन्हेगार इसमां विरुध्द विविध कायदया प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
तेसच जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागु करण्यात आलेले आहे. बकरी ईद अनुषंगाने जिल्ह्यात एकुण 20 ठिकाणी चेकनाके स्थापन करण्यात आले असुन अवैध प्श्राणी वाहतुक यांचेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असुन उस्मनाबाद शहर, लोहारा, बेंबळी पोलीस ठाणे अंतर्गत अशा इसमांविरुध्द गुन्हेही दाख्ल करण्यात आलेले आहेत.
नमुद सण/उत्सव अनुषंगाने बंदोबस्त करीता उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस अधिकारी-90 पोलीस अंमलदार 1060 व दंगल नियंत्रणचे 02 पथके, QRT चे 02 पथके, यांचे सह अतिरिक्त मनुष्यबळ म्हणुन होमगार्डस-650 तसेच SRPF-01 कंपणी तैनात करण्यात आलेले असुन पोलीस प्रशासन सज्ज आहे.
पोलीस दलाकडून नागरीकांना आवाहन
बकरी ईद व आषढी एकादशी अनुषंगाने नागरीकांनी एकमेकांच्या धार्मिक परंपरा व रितीरिवाजाचे आदर करुन सौहार्दपुर्ण वातावरणात सण/उत्सव शांततेतपार पाडावेत. नागरीकांनी आफवांवर व सोशल मिडीयावर प्रसारीत होणारे संदेश यावर विश्वास न ठेवता सन उत्सव शांततेत पार पाडावे.