वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
माजी मंत्री, आ. बच्चू कडू यांचा आज सकाळी अपघात झाला आहे. अमरावती येथे सकाळी सहा ते साडे सहा च्या सुमारास रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने बच्चू कडू यांना धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. यात बच्चू कडू यांच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती मिळत आहे. अमरावती येथील खाजगी रुग्णालयात आ. बच्चू कडू यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघात झाल्याची माहिती त्यांच्या फेसबुक पेजवर देण्यात आली आहे. त्यात म्हणले आहे की,
आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये.
वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क माजी मंत्री, आ. बच्चू कडू यांचा आज सकाळी अपघात झाला आहे. अमरावती येथे सकाळी सहा ते साडे सहा च्या सुमारास रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने बच्चू कडू यांना धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. यात बच्चू कडू यांच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती मिळत आहे. अमरावती येथील खाजगी रुग्णालयात आ. बच्चू कडू यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात झाल्याची माहिती त्यांच्या फेसबुक पेजवर देण्यात आली आहे. त्यात म्हणले आहे की, आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये. – आ. बच्चू कडू