वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मराठा आरक्षणाचा मुद्द्याने सर्वत्र चांगलाच जोर धरला असताना भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका केली. या टीकेला संभाजीराजे यांचे स्वीय सहाय्यक योगेश केदार यांनी फेसबुक पोस्ट लिहून प्रत्युत्तर दिले आहे.
मराठा आरक्षणसंदर्भात छत्रपती संभाजीराजे मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यात सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांचाही समावेश आहे. याच मुद्द्यावरून भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टिका केली. त्यानंतर खा. संभाजीराजे यांचे स्वीय सहाय्यक योगेश केदार यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून खासदार राणे यांच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केदार यांनी फेसबुकवर ही पोस्ट लिहिल्यांनंतर सर्वत्र याच पोस्टची चर्चा सुरू आहे.
योगेश केदार यांनी काय लिहिल आहे फेसबुक पोस्ट मध्ये –
आदरणीय राणे साहेब,
तुम्हाला लोक फार खालच्या स्तरावर जाऊन टीका करतात. कुणी कोंबडी चोर म्हणतं तर कुणी बेडूक…. अश्या नानाविध असंसदीय शब्दांनी आपल्यावर शिंतोडे उडवतात. परंतु आमच्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत. आम्ही तुम्हाला मुद्द्यांवरून न हटता उत्तरे देऊ.
छत्रपतींवर टीका करण्याची तुमची लायकीच नाही असे म्हणणार नाही, तुम्ही टीका करू शकता. परंतु, साहेब छत्रपती सोबत लोकच नाहीत हा कुठला शोध लावला. आम्ही तुमच्या मालवण ला, आरक्षणाची बैठक घ्यायला, किंवा तुम्हाला कोंडीत पकडायला आलो नव्हतो, तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर तोकते वादळामुळे झालेली पडझड बघायला आलो होतो. मराठा समाजाचे कल्याण तुम्ही सर्वच सत्ताधाऱ्यांनी किती केलं? जग जाहीर आहे. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र दौरा, सुरू असतानाच, शेकडो किलोमीटर चा प्रवास करून संभाजी महाराज पोचले. का तर त्यांना त्यांच्या पूर्वजांनी ठेवलेला वारसा जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सोडा. तुम्हा सारख्या मोठ्या लोकांना वेळ कुठे असतो दुसरे काय काम करतात हे पाहण्यासाठी.
दुसरा मुद्दा खासदारकी बाबत तर तुम्ही बोलूच नये. छत्रपती संभाजी महाराजांनी खासदारकी घेतल्यानंतर किती कामे केलीत हे पाहिलं तर तुमच्या अख्या हयातीत जे करू शकला नाही त्यापेक्षा जास्त कामे केली आहेत. म्हणूनच देवेंद्र फडणवीसजी नी विधानसभेत केवळ संभाजी महाराजांचे नाव घेतले.
तुमच्यावर सुद्धा वैयक्तिक उपकार केले आहेत महाराजांनी. मुंबई महामोर्चा वेळी, तुमच्या चिरंजीवांच्या गाडीची काय अवस्था केली होती मराठा समाजाने याची माहिती घ्या. मानवी कडे करून सुरक्षित ठिकाणी न्यावे लागले होते. झेंड्याचे दांडे हातात घेतले होते मराठा समाजाने. त्यामुळे लक्षात घ्या जो लाखोंचा जमाव राजेंच्या एका शब्दावर घरी परतला, त्याच ठिकाणी राजेंच्या शब्दां खातर लोकांनी नितेश ना सोडून दिले. मग राजे सोबत प्रजा नाही हे कसे म्हणता तुम्ही? त्या आधी 2013 चा मुंबई मधील मोर्चा झाला त्यावेळी तुम्ही राणे समिती वर असताना, स्टेज खालून चपला दाखवल्या होत्या. तिथेही संभाजीराजेंनी पोरांना शांत केलं होतं. हे तुम्ही विसरला असला म्हणून काय झाले? आम्ही नाही.
पक्ष संघटना याबाबत तुम्ही सांगायची गरज नाही. साहेब स्वतःचा स्वाभिमान घान ठेऊन दुसऱ्याची तळी उचलण्याचे संस्कार छत्रपती चे नाहीत. स्वतः पेक्षा समाज मोठा मानणारे लोक च, समाजाच्या हितासाठी काम करतात. त्यांचा स्वतःसाठी, किंवा राजकीय हेतू साठी कधीही वापर करत नाहीत.
बहु काय बोलो? शहाण्यास इशारा पुरेसा असतो.
योगेश केदार
मावळा छत्रपतींचा
https://www.facebook.com/100006755677570/posts/3026812850887208/?d=n