वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मंगळवारी दि. १० ऑगस्ट रोजी १८ वर्षाच्या पुढील नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. तसेच ज्यांना पहिला डोस घेऊन किमान २८ दिवस झाले आहेत अशांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. याकरिता जिल्ह्यातील लोहारा, मुरूम, सास्तुर, तेर, वाशी, भूम ग्रामीण रुग्णालय, तुळजापूर, उमरगा, कळंब, परांडा उपजिल्हा रुग्णालय तसेच उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद या १२ केंद्रावर ही लस देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड सोबत बाळगावे. या केंद्रावर केवळ १८ वर्षाच्या पुढील नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. तसेच ज्या नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस झाले आहेत अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये. या सर्व लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांना केवळ पहिला डोस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी आणि केवळ दुसरा डोस घेण्यासाठी ऑन साईट (ऑन स्पॉट) नोंदणी या सुविधा उपलब्ध आहेत. दि. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात येणार आहेत अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने प्रेसनोटद्वारे देण्यात आली आहे.
(या न्युज पोर्टलवरील बातम्यांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मिळविण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा !)