Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ देणार कोविडमुळे आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या मुलांना मोफत शिक्षण – मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतिश चव्हाण यांनी दिली माहिती

by admin
in मराठवाडा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मराठवाड्यात कोविडमुळे आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने घेतला आहे. संस्थेच्या कुठल्याही शाळा अथवा महाविद्यालयात सदरील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल अशी माहिती मंडळाचे सरचिटणीस आमदार सतिश चव्हाण यांनी दिली आहे.\"\"मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने घेतलेल्या या निर्णयाबाबत माहिती सांगताना मंडळाचे सरचिटणीस आमदार सतिश चव्हाण म्हणाले की, मागील दीड वर्षांपासून आपण कोविड १९ या आजाराचा सामना करत आहोत. या आजारामुळे आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने अनेक मुले अनाथ झाली आहेत. त्यामुळे अशा या संकट काळात या मुलांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे. यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने मराठवाड्यात कोविडमुळे आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेच्या कुठल्याही शाळा अथवा महाविद्यालयात सदरील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल.\"\"स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढाकारातून १९५८ साली सुरू झालेली आमची ही शैक्षणिक संस्था आज आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदानाबरोबरच सामाजिक भान देखील जपण्याचे काम करीत आहे. मागील वर्षी संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी पुढाकार घेत सामाजिक जाणिवेतून ‘मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड १९’साठी रू. ५१ लाख व ‘पीएम केयर्स फंड’साठी रू. ५१ लाखाचा निधी दिला होता. तसेच पहिल्या व दुसर्‍या लाटेत कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने संस्थेच्या शाळा व महाविद्यालयात ९ ठिकाणी कोविड सेंटरसाठी प्रशासनाला जागा उपलब्ध करून दिली. लॉकडाऊनच्या काळात संस्थेच्यावतीने १० हजार गरजू कुटुंबांना अत्यावश्यक किराणा \’कीट\’चे वाटप केले. तसेच कोविडच्या सुरूवातीच्या काळात स्थलांतर करणार्‍या मजूरांसाठी संस्थेच्या वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात चहा, अल्पोहार व दोन वेळेच्या भोजनाची महिनाभर मोफत व्यवस्था केली होती अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना सांगितली.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे कोविडमुळे आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या मुलांना मोठा आधार मिळणार आहे. मंडळाच्या या निर्णयाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Ad 2
Ad 1
Tags: आमदार सतिश चव्हाणमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ
Previous Post

मातंग समाजाने आपल्या हक्कासाठी एकत्र येऊन निर्धार करावा – अशोकराजे सरवदे यांचे आवाहन

Next Post

जेवळी (दक्षिण) येथील महादेव राजकुमार कारभारी यांची शिवा संघटनेच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी निवड

Related Posts

मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

मराठवाडा

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Next Post

जेवळी (दक्षिण) येथील महादेव राजकुमार कारभारी यांची शिवा संघटनेच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!