Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

मातंग समाजाने आपल्या हक्कासाठी एकत्र येऊन निर्धार करावा – अशोकराजे सरवदे यांचे आवाहन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे आपल्या न्याय हक्कासाठी ऊर्जा निर्माण करणारे आहे. निर्धार केल्याशिवाय निर्णय होत नाही. त्यामुळे मातंग समाजाने आपल्या हक्कासाठी एकत्र येऊन निर्धार करावा असे मत संविधान बचाव परिषदेचे नेते अशोकराजे सरवदे यांनी व्यक्त केले. लोहारा तालुक्यातील होळी येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीचे औचित्य साधून साहित्यरत्न सत्यशोधक अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. माजी सभापती बाबुराव राठोड हे होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, लोहारा पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, ऍड. शितल चव्हाण, संजय बिराजदार, होळीच्या सरपंच बिराजदार, फकीरा दलाचे संस्थापक अध्यक्ष सतिश कसबे, रंजना हासुरे, रमेश पात्रे, लोहारा पंचायत समितीचे माजी उपसभापती दयानंद थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

\"\"यावेळी बोलताना शरण पाटील म्हणाले की, तालुक्यातील मातंग समाजाने नेहमीच काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे मोठी ताकद उभी केलेली आहे. या समाजाने प्रामाणिकपणे आम्हाला कायम साथ दिली आहे. आम्ही त्यांचे ऋणी आहोत. भविष्यात या समाजाला न्याय देण्याची भूमिका निश्चितपणे आमची असेल असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील कामगारांचे नेते आणि थोर साहित्यिक साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची प्रेरणा सतत समाजाला मिळावी म्हणून उमरगा नगरपालिकेत त्यांच्या पुतळ्याचा ठराव आम्ही या १०१ व्या जयंतीचे औचित्य साधून एकमताने मंजूर केला. महापुरुषांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून आम्ही सदैव तत्पर आहोत असे मत शरण पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी ऍड. शितल चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, सतिश कसबे, संजय सरवदे यांनीही आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी दिलीप गायकवाड, विष्णूपंत खंडागळे, महादेव वाघमारे, संजय कांबळे, सुशांत दुनगे, शिवाजी दुनगे, होळीच्या जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण ढोबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुखदेव होळीकर यांनी केले. केशव सरवदे यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी केशव सरवदे, कृष्णा सरवदे आदींसह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Ad 2
Ad 1
Tags: अण्णाभाऊ साठे जयंती
Previous Post

पक्षबांधणीसाठी युवकांनी पुढाकार घेऊन अधिक सक्रिय होणे आवश्यक आहे – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिवपदी दिलीप भालेराव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

Next Post

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ देणार कोविडमुळे आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या मुलांना मोफत शिक्षण – मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतिश चव्हाण यांनी दिली माहिती

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ देणार कोविडमुळे आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या मुलांना मोफत शिक्षण - मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतिश चव्हाण यांनी दिली माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!