वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
माजी मंत्री आ. बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई येथील गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
माजी मंत्री आ. बच्चू कडू यांच्याविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. या प्रकरणी गिरगाव कोर्टाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वारंट काढले होते. आ. बच्चू कडू आज न्यायालयात हजर झाले होते. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. तसेच त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. त्याप्रमाणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे.