वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लिंगायत धर्मास संवैधानिक मान्यता द्यावी, केंद्र व राज्य सरकारने लिंगायत समाजास अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी मुंबई येथे लिंगायत महामोर्चा होणार आहे. त्या संदर्भात लोहारा शहरात सोमवारी (दि.९) लिंगायत समन्वय समितीची बैठक पार पडली.
लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासाठी दि.२९ जानेवारीला मुंबई येथील आझाद मैदानावर महामोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात जास्तीत जास्त समाजबांधवांनी सहभागी व्हावे तसेच या मोर्चाची माहिती व्हावी यासाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक अँड. अविनाश भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोहारा येथील महात्मा बसवेश्वर मंदिरात सोमवारी (दि.९) बैठक संपन्न झाली. या बैठकीत मुंबई मोर्चा संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी माजी सरपंच नागन्ना वकील, शंकर जट्टे, दत्तात्रय बिराजदार, शंकर वकील,
जालिंदर कोकणे, बलू स्वामी, विश्वनाथ माशाळकर, हरी लोखंडे, दिपक मुळे, मल्लिनाथ घोंगडे, बसव ब्रिगेड जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटील, गणेश खबोले, तालुकाध्यक्ष वीरभद्र फावडे, महेश पाटील, गजेंद्र सुतार, लक्ष्मण भुजबळ, भरत सुतार, प्रभुलिंग बस्टे, रामेश्वर वैरागकर, राजकुमार स्वामी, राजु कोराळे, नागेश वकील, देवप्पा भुजबळ, जीवन गिराम, शिवहर स्वामी, चंद्रकांत भुजबळ, संदीप पाटील यांच्यासह लोहारा शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.