Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

महाराष्ट्राची व महापुरुषांची ओळख नसलेला राज्यपाल मोदींनी आपल्याला भेट दिला – डॉ. श्रीपाल सबनीस

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत डिजिटल न्युज नेटवर्क
सध्या महाराष्ट्रातील महापुरुषांची बदनामी करणारी वक्तव्ये अनेक पुढारी करत आहेत. ज्याला महाराष्ट्राची ओळख नाही असा राज्यपाल आपल्याला भेट देण्यात आली आहे अशी जोरदार टीका डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी (दि. ८) केली आहे.
लोहारा तालुक्यातील होळी येथे उमरगा लोहारा तालुका मातंग समाज लहुशक्ती यांच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, महाराष्ट्र मातंग समाज लहु शक्तीचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत शिंदे, अण्णाभाऊ साठे यांच्या सून सावित्रीमाई साठे, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अशोकराजे सरवदे, माजी जि.प. सदस्य दिपक जवळगे, ऍड. प्रभाकर लोंढे, शितल चव्हाण, राम चव्हाण, सतीश कसबे, सुखदेव होळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

\"ग्रंथदिंडी\"
या साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी व शोभायात्रेने करण्यात आली. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत घोड्यावरील युवक, सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील युवती उपस्थितांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक सुखदेव होळीकर यांनी केले. यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवराना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

\"साहित्य
यावेळी पुढे बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊचे प्रचंड मोठे योगदान आहे. महाराष्ट्रासाठी अनेक महापुरुषांनी मोठे योगदान दिले आहे. परंतु सध्या काय सुरू आहे. राजकारणातील अनेक पुढाऱ्यांकडून महापुरुषाबद्दल चुकीची वक्तव्ये करून त्यांची बदनामी केली जात आहे. महाराष्ट्र एक व्हावा, महाराष्ट्राने भारताचे नेतृत्व करावे अशी परंपरा आहे. परंतु सध्या वेगळीच स्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या बद्दल बदनामीकारक वक्तव्ये केली जात आहेत. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला महाराष्ट्राची ओळख नाही, महापुरुषांबद्दल माहिती नाही असा राज्यपाल मोदींनी आपल्याला भेट दिला आहे अशी जोरदार टीका यावेळी डॉ. सबनीस यांनी केली.

\"शोभायात्रा\"
या संमेलनात चार ठराव संमत करण्यात आले. महाराष्ट्रातील एक इंचही जमीन कर्नाटक सरकारला देणार नाही, महापुरुषांच्या होत असलेल्या अवमानाबद्दल जाहीर निषेध, मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, अण्णाभाऊना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा हे चार ठराव स्वागताध्यक्ष अशोकराजे सरवदे यांनी मांडले. त्याला उपस्थितांनी पाठिंबा दिला. यावेळी होळीच्या सरपंच सरोजा बिराजदार, सुरेश वाले, बसवराज वरनाळे, प्रा. व्यंकटेश कसबे, रंजना हासुरे, लोकजागर सांस्कृतिक मंचाचे पवार सर यांच्यासह होळी व परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संमेलनासाठी सरपंच सरोजा बिराजदार यांच्यासह युवराज कोकाटे, ओम बिराजदार, संजय बिराजदार, बालाजी मडोळे, लक्ष्मण राठोड, राम जाधव, दत्ता गायकवाड, बालाजी सरवदे, प्रताप होळीकर, बालाजी बनसोडे आदींनी परिश्रम घेतले. प्रा. जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

Ad 2
Ad 1
Tags: डॉ. श्रीपाल सबनीसमहाराष्ट्रराज्यपाल
Previous Post

मुंबई येथील मोर्चा संदर्भात लोहारा शहरात लिंगायत समन्वय समितीची बैठक

Next Post

हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन पाण्याच्या टाकीवर चढले शेतकरी – लोकमंगल कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन पाण्याच्या टाकीवर चढले शेतकरी - लोकमंगल कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!