मुरूम येथे शिवजन्मोत्सव समिती किसान चौक व किसान ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिवस्वराज्य दिन साजरा – रक्तदान शिबिराचे आयोजन – शिबिरात एकूण 35 रक्तदात्यांनी केले रक्तदान
वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शिवजन्मोत्सव समिती किसान चौक मुरुम व किसान ब्रिगेड महाराष्ट्र राज्य आयोजित शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने मुरुम शहरातील किसान चौक येथे शिवस्वराज्य दिनानिमित्त भगवा ध्वजारोहण करुन हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक मुरुम पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगताप साहेब, डॉ. सत्यजित डुकरे व माजी सैनिक व्यंकटराव चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यास किसान ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्या वतिने हेल्मेट व कुकर भेट म्हणून सुपूर्द करण्यात आले. यावेळी भीमराव दाजी फुगटे, महादेव टेकाळे, शिवाजी जाधव, किसान ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भगत माळी, दादा बिराजदार, रवींद्र जाधव, दयानंद इंगळे, सुनिल खंडागळे, गोपाळ इंगोले, बाळासाहेब फुगटे, ओंकार फुगटे, सागर जगदाळे, गोपाळ सोबाजी, गणेश महाराज, नितिश राजपूत, लखन सत्रे, गणेश डोंगरे, किरण सोबाजी, महेश जाधव, हुसेन नुरसे, विनोद वाघ, प्रथमेश शेळके, रोहित टेकाळे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शुभम फुगटे, रवी चौधरी, पवन माने, योगेश फुगटे, आदित्य जोगी आदींनी पुढाकार घेतला.