वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
खरीप हंगाम 2020 पीकविमा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही तीन आठवड्याच्या आत नुकसानभरपाई दिली नसल्याने पीकविमा कंपनी विरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.
29 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे 6 ऑक्टोबर पर्यंत पिक विमा कंपनीने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पैसे दिले नाहीत. केवळ सर्वोच्च न्यायालयात जमा असलेली रक्कम 200 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 536 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
उर्वरित 336 कोटी रुपये रक्कम वारंवार मागणी करूनही कंपनीने दिली नाही. जिल्ह्यातील 3 लाख 57 हजार 287 शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सहा ऑक्टोबर पर्यंत पैसे मिळणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान झाला. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्यावतीने सोमवारी (दि.31) अवमान याचिका दाखल करण्यात आली.