Wednesday, November 11, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा होणार ऐतिहासिक – दुर्मिळ \’सुवर्ण होन\’ च्या साक्षीने होईल राज्याभिषेक

by admin
in महाराष्ट्र
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
रायगडावर ६ जून ला दरवर्षी मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा होतो. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. तरीही यावर्षीचा राज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक होणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सार्वभौम स्वराज्याचे प्रतीक असलेल्या \’सुवर्ण होन\’ च्या साक्षीने हा राज्याभिषेक सोहळा होणार आहे. अत्यंत दुर्मिळ असलेला हा सुवर्ण होन छत्रपती संभाजीराजेंनी अत्यंत कष्टाने मिळवला आहे. इतिहासकार, अभ्यासक, आणि शिवभक्तांसाठी हा अत्यंत अमूल्य ठेवा उपलब्ध करून दिल्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

\"\"
हे \’सुवर्ण होन\’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सार्वभौम स्वराज्याचे प्रतीक आहे. महाराजांनी राज्याभिषेक करवून घेतला आणि आपले \’सुवर्ण होन\’ स्वराज्यात चलनात आणले. हे सुवर्ण होन आता शक्यतो पाहायला मिळत नाहीत. हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच ते असतील. आपण सहसा जे पाहतो, ती शिवराई असते. शिवराई आपल्याला खूप भेटतील. परंतु होन भेटणे अत्यंत दुर्मिळ. आत्तापर्यंत अधिकृत बोलीमध्ये एका सुवर्ण होनची किंमत 80 लाख रुपये लावली होती. एका शिवभक्ताने स्वतःच्या वैयक्तिक कलेक्शन साठी एका होन करिता एक कोटी 25 लाख रुपये मोजले असल्याचे समजते. यावरून लक्षात येईल की या सुवर्ण होन चे किती महत्त्व आहे.

\"\"छत्रपती संभाजीराजे याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हणले आहे की, यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दुर्मिळ व अमूल्य अशा ऐतिहासिक शिवकालीन \’होन\’ च्या साक्षीने साजरा होणार… स्वराज्याचे सार्वभौमत्व व संपन्नतेचे प्रतीक असणारा \’होन\’ हे केवळ चलन नसून आपली अस्मिता आहे; राष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. रायगडच्या पवित्र भूमीत मिळालेल्या या ऐतिहासिक \’होन\’च्या साक्षीनेच यंदाचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार अशी पोस्ट छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुकवर केली आहे.
यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. त्यामुळे शिवभक्तांनी आपापल्या घरी राहूनच शिवराज्याभिषेक साजरा करावा असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी शिवभक्तांना केले आहे.

Ad 2
Ad 1
Tags: रायगडशिवराज्याभिषेक सोहळा
Previous Post

माकणी गावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल – ग्रामपंचायत, आरोग्य विभागाचे प्रयत्न – तरीही आणखी काही दिवस काळजी घेणे आवश्यक

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते नागुर येथील विलगीकरण कक्षाचा होणार शुभारंभ

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते नागुर येथील विलगीकरण कक्षाचा होणार शुभारंभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!