वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे युवा नेते किरण गायकवाड यांच्या हस्ते शिवसेनेच्या वतीने व स्पर्श रुग्णालयाच्या सहकार्यातून सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाचा शनिवारी (दि.२२) शुभारंभ करण्यात आला.
मागील आठवडाभराच्या काळात सास्तूर गटातील सालेगाव, तावशीगड, मुर्शदपूर, उदतपूर, कोंडजीगड, राजेगाव, रेबे चिंचोली, होळी, एकोंडी (लो) आदी गावात मिळून ५० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्याने सास्तूर येथे विलगीकरण कक्ष सुरु करण्याची मागणी सास्तूर परिसरातून मोठ्या प्रमाणात येत होती. ही गरज ओळखून आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते किरण गायकवाड यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सास्तूर येथे विलगीकरण कक्ष स्थापण्याचा निर्णय घेतला. यासाठी स्पर्श रुग्णालयाचे समन्वयक डॉ. रमाकांत जोशी यांचे सहकार्य घेऊन या २० बेड्चे विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले. तसेच सास्तूर गटातील प्रत्त्येक गावात शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांची कोरोनाविषयक लक्षणे तपासण्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीमची स्थापना करण्यात आली.
यावेळी स्पर्श रुग्णालयाचे समन्वयक रमाकांत जोशी, मुरली पवार, बालेपीर शेख, लायक कादरी, गहिनीनाथ देशमुख, शाहेबाज मुल्ला, मोहन नारायणकर, वसीम कादरी, प्रदीप मोरे, ग्रामसेवक डी. आय. गोरे, मंडळ अधिकारी कोकणे, महम्मद बागवान, साजिद शेख, विनायक बारकुले, गोविंद कोळी, आदी उपस्थित होते.