वार्तादूत – डिजिटल न्युज उस्मानाबाद / सुमित झिंगाडे
उमरगा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रीय काँग्रेसच्या सरपंच लिलावती रामराव जेऊरे व सर्व सदस्यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष मा.श्री.बसवराज पाटील व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विठलसाई कारखान्याचे व्हा.चेअरमन सादीकमिया काझी, उमरगा जनता बँकेचे माजी चेअरमन रामकष्णपंत खरोसेकर, प्रदेश कॉग्रेसचे सचिव दिलीप भालेराव, आदर्श महाविदयालयाचे प्रा.डॉ.दिलीप गरुड, देवेंद्र कंटेकूरे, माणिकराव राठोड, जि.प.सदस्य रफिक तांबोळी, येणेगुर सोसायटीचे माजी चेअरमन बाबासाहेब बिराजदार, धनराज गुंजोटे, सतिश मुदकण्णा, श्रीहर उटगे, अब्दुल खादर कोकळगांवे, श्रीशैल्य बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.
येणेगुर ग्रामपंचायतचे नूतन सदस्य विजयकुमार सोनकटाळे, प्रविण कागे, संदीप बिराजदार, बाबासाहेब गायकवाड, इसुफ मुल्ला, दत्तात्रय बिराजदार, राहुल बनसोडे, सौ.राणीताई सुरवसे, सौ.गायत्री हिप्परगे, सौ.आशाबानु मकानदार, सौ.लक्ष्मी पाटील, सौ.ज्योती मुदकण्णा, सौ.गुरुबाई बिराजदार, सौ.गौराबाई माळी, सौ.जिजाबाई कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.