Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

रयत शिक्षण संस्थेने नोंदविला मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध

admin by admin
11/12/2022
in महाराष्ट्र, शैक्षणिक
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा रयत शिक्षण संस्थेकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत रयत शिक्षण संस्थेने एक प्रेसनोट दिली आहे.
या प्रेसनोट मध्ये म्हणले आहे की, महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील गोर-गरीब, डोंगर दऱ्यांमध्ये राहणाऱ्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना १०३ वर्षापूर्वी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.

शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे एकमेव साधन आहे ही कर्मवीरांची दूरदृष्टी होती. म्हणून त्यांनी या मुलांच्या शिक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. किलोस्कर, ओगले, कूपर या कंपनीमध्ये कर्मवीरांनी जे काम केले त्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न, त्यांच्याकडे असलेल्या शेतीच्या माध्यमातील उत्पन्न, किर्लोस्कर कंपनीतील अण्णांचे शेअर्स, आई- वडीलांच्या नावे असलेली शिल्लक रक्कम, पत्नी सौ. लक्ष्मीबाई यांच्या माहेरकडून मिळालेले १०० तोळे सोने, मंगळसूत्र सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केले.

रयत शिक्षण संस्था सातारा

विद्याथ्यांनी भीक मागून शिकण्यापेक्षा स्वावलंबनाने, स्वकष्टाने आपले शिक्षण पूर्ण करावे हे कर्मवीरांचे शैक्षणिक तत्वज्ञान होते. यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘कमवा व शिका ही अभिनव योजना राबविली. आज या योजनेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. म्हणूनच ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हे कर्मवीरांनी संस्थेचे ब्रीद घेतले.

कर्मवीरांच्या या कार्याला समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन लोकसहभागातून ही शैक्षणिक चळवळ अधिकाधिक व्यापक केली. बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी समाजाने उत्स्फूर्त सहभाग घेतला. या माध्यमातून कोट्यावधी मुलांना शिक्षण मिळाले. आज महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर दिसतो आहे त्याला अण्णांचे स्वावलंबी शिक्षणाचे हे तत्वच कारणीभूत आहे असे म्हटले तर अनुचित ठरणार नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज हे कर्मवीरांचे आदर्श होते. याच कालखंडात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा

कर्मवीरांना मोठे सहकार्य लाभले. म्हणून ज्ञानाने समृद्ध असलेली पिढी कर्मवीर निर्माण करू शकले. या सर्व पार्श्वभूमीवर ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी काल केलेले विधान अत्यंत दुर्देवी आहे. त्याचा संस्थेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.

रयत शिक्षण संस्था, सातारा

Tags: चंद्रकांत पाटीलरयत शिक्षण संस्था
Previous Post

धनगर समाजाचा चळवळीतील कार्यकर्ता हरपला

Next Post

भेदभाव न करता मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा सत्य इतिहास लोकांना माहीत झाला पाहिजे – प्रा.डाॅ. सतीश कदम

Related Posts

प्रा. डॉ. प्रितम मुळे यांना रसायनशास्त्र विषयातील पीएचडी
शैक्षणिक

प्रा. डॉ. प्रितम मुळे यांना रसायनशास्त्र विषयातील पीएचडी

12/12/2025
मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा
लोहारा तालुका

मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा

04/12/2025
होळी जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन साजरा
लोहारा तालुका

होळी जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन साजरा

27/11/2025
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; माकणी येथे जवाहर नवोदय प्रवेश सराव परीक्षेचे आयोजन
लोहारा तालुका

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; माकणी येथे जवाहर नवोदय प्रवेश सराव परीक्षेचे आयोजन

20/11/2025
आरणी येथील शाळेत बालदिन साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील शाळेत बालदिन साजरा

15/11/2025
बेलवाडी जिल्हा परिषद शाळेत गणवेश वाटप
लोहारा तालुका

बेलवाडी जिल्हा परिषद शाळेत गणवेश वाटप

09/10/2025
Next Post

भेदभाव न करता मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा सत्य इतिहास लोकांना माहीत झाला पाहिजे - प्रा.डाॅ. सतीश कदम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's