प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय ज्युदो क्रीडा स्पर्धा २०२२-२३ चे आयोजन विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे दि. १८ ते २२ एप्रिल रोजी करण्यात आल्या होत्या. लातूर विभागाच्या वतीने ७० किलो पुढील वजन गटात आस्मिता अमोल पाटीलने तिसरा क्रमांक मिळवत ब्रांझ पदक प्राप्त केले.
अमरावती येथे दिनांक १९ रोजी संपन्न झालेल्या १९ वर्ष वयोगटाखालील ७० किलो वजन गटासाठी झालेल्या स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बलसुर येथील ११ वीतील विद्यार्थीनी अस्मिता पाटीलने नांदेड, उस्मानाबाद, लातुर जिल्हयाच्या वतीने लातुर विभागाचे प्रतीनीधीत्व करत तृतीय क्रमांक मिळवत ब्रांझ पदक पटकवत यश मिळवले. क्रीडा व युवक सेवा संचनालय अमरावती विभागाचे उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रिडा अधीकारी तथा सदस्य सचिव विजय खोकले व मान्यवरांच्या उपस्थितीत अस्मिताला मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
अस्मिता पाटीलच्या या यशाबद्दल शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. सुरेश बिराजदार, संस्थेच्या अध्यक्षा सौ. शैलजाताई मगर, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीपाद कुलकर्णी, उस्मानाबाद जिल्हा ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष नितीन काळे, सचिव प्रवीण गडदे, विभागप्रमुख प्रताप राठोड, कैलास लांडगे यांच्यासह ओम साई स्पोर्टस क्लब, टायगर्स तायकाँदो कराटे असोसिएशन, परिवर्तन मंच, अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह विविध संघटनांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.