उस्मानाबाद :- दि ६ ते ८ डिसेंबर दरम्यान शहरातील तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम वर आयोजित २३ वर्षाखालील पुरुष व महिला राज्यस्तरीय ऍथलेटिकस अजिंक्यपद स्पर्धेचा दि ८ डिसेंबर रोजी सायंकाळी बक्षीस वितरण उस्मानाबाद नगरीचे मा. नगराध्यक्ष अमित शिंदे व मा. गटनेता युवराज नळे,महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष प्राचार्य राजू प्याटी व संजय पाटील,संजय देशमुख व भरत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव योगेश थोरबोले, सहसचिव राजेंद्र सोलनकर, सचिन पाटील, श्रीकांत शिंदे, अजय देसाई, नितीन देशमुख, अर्जुन देशमुख, अर्जुन केसकर, कुलदीप सावंत,रामकृषण खडके, अश्विन पवार, रवींद्र केसकर, पालघर जिल्हाचे सचिव राकेश सावे, राजेश बिलकुले यांची प्रमुख उपस्थित विविध क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले . यशवंत गुंजाळ व निकिता सराटे यांना सरवोत्कृट धावपटू म्हणून गौरवण्यात आले.
या स्पर्धेत उस्मानाबाद च्या विशाल बनसोडे याने ५km व १० km धावणे मध्ये द्वितीय क्रमांक,रोहित सुरवसे थाळी फेक तृतीय क्रमांक,रोहन खवले ४००मी अडथळा व मयुरी पवार थाळी फेक तृतीय क्रमक मिळविले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कोथळीकर तर आभार संघटनेचे सचिव योगेश थोरबोले यांनी खासदार ओम राजेनिंबाळकर,आमदार कैलास पाटील,आमदार ज्ञानराज चौगुले तसेच तसेच इतर प्रमुख अथिती मान्यवर, राज्य ऍथलेटिकस संघटना ,स्पर्धेला मदत करणारे हाफ मॅराथॉन गृप इतर पदाधिकारी ,पंच याचें मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजिंक्य वराळे,माउली भुतेकर,रोहित सुरवसे,ऋषिकेश काळे, योगिनी साळुंके, प्रणिता जाधवर इत्यादींनी परिश्रम घेतले.