वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील शनिवारी (दि.२०) उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान विधानसभा मतदारसंघ कार्यकारिणी आढावा बैठक, जिल्हा कार्यकारिणी बैठक आदी कार्यक्रम होणार आहेत.
कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ खानदेश मध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले. या यात्रेच्या मराठवाडा दौऱ्याची सुरुवात उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून होणार आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांचे शनिवारी ( दि. २०) सकाळी ७ वाजता तुळजापूर येथे आगमन होणार आहे. सकाळी ८ वाजता तुळजाभवानी देवीचे दर्शन, सकाळी ९.३० ते १०.३० या कालावधीत तुळजापूर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक तर १०.३० ते ११.१५ या कालावधीत उमरगा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर उस्मानाबादकडे प्रयाण होईल. ११.४५ वाजता उस्मानाबाद मध्ये आगमन, त्यानंतर ११.४५ ते १२.४५ या दरम्यान उस्मानाबाद जिल्हा जलसंपदा अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी १२.४५ ते १.४५ या दरम्यान उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १.४५ ते २.३० या दरम्यान उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक होणार आहे. दुपारी २.३० ते २.५० या कालावधीत पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी ३.५० वाजता वाशीकडे प्रयाण करतील. या दरम्यान ४.१५ ते ४.३० या कालावधीत येडाई व्यसनमुक्ती केंद्रास भेट देणार आहेत. दुपारी ४.४० वाजता वाशी येथे आगमन होईल. ४.४० ते ५.४० या दरम्यान भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर लातूर कडे प्रयाण होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दि. १६ फेब्रुवारी रोजी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.