वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
आमच्या गावची खरी संपत्ती ही जेष्ठ नागरिक व शेतकरी हीच असून आपण कुटुंबातील व गावातील सर्व ज्येष्ठ माणसांना योग्य तो आदर, मान सन्मान देवून त्यांची सेवा केली पाहीजे असे मत सरपंच सुनिता पावशेरे यांनी व्यक्त केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रविवारी (दि. १२) कलदेव निंबाळा ग्रामपंचायतीच्या मैदानावर ज्येष्ठ नागरिक व शेतकरी सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच सुनीता पावशेरे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, जेष्ठ नागरिक व शेतकऱ्यांचा सत्कार म्हणजे पवार साहेबांचाच सत्कार केल्यासारखा वाटतो आहे. कारण महाराष्ट्र या कुटुंबातील ते जेष्ठ असे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून हा कार्यक्रम आयोजला आहे. महाराष्ट्राची कृषी, शैक्षणिक, उद्योग, सहकार यासह आपल्या भूकंपग्रस्त भागाचीही भरभराट व प्रगती पवार साहेबामुळेच झाली आहे. आम्ही त्यांना बारामतीत भेटायला गेल्यानंतर ते आपल्या गावातील शेतकऱ्यांविषयी, भूकंपग्रस्त भागाविषयी आपुलकीने माहिती विचारत होते अशी आठवण सांगितली. आजही त्यांच्यात ग्रामीण जनतेविषयी आपुलकी आहे असे सरपंच सुनिता पावशेरे यांनी सांगितले.यावेळी गावातील १०१ जेष्ठ नागरिकांचा सत्कार करून फळांचे वाटप – चहापान करण्यात आले. सुत्रसंचलन देविदास पावशेरे यांनी केले .यावेळी प्रभाकर बिराजदार, राहूल डोणगावे यासह उपस्थित युवकांनी जेष्ठ नागरिकांचा सन्मान केल्याबद्दल सरपंचाचे आभार मानले. चेअरमन तुकाराम बिराजदार, पोलीस पाटील पांडूरंग पाटील, माजी सरपंच बाबूराव पावशेरे, ग्रामपंचायत सदस्या छाया भालेराव, अनिरुद्ध तळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्रीरंग बिराजदार, नरसिंग घोटमाळे, बाबूराव घोटमाळे, शंकर भांडेकर, महताब मुल्ला, बळीराम पाटील, मुरलीधर सुर्यवंशी, नरसिंह जोशी, बाबुराव मुदगडे, विनायक गायकवाड, तुकाराम घोटमाळे, गुलाब मुल्ला, पंडीत मुसांडे, विठ्ठल बलसुरे, पांडूरंग पाटील कसगीकर, मनोहर हिरवे, बाबूराव कांबळे, शिवाजी कदम, उत्तम सरवदे, नरसिंह जोशी, वैजनाथ कल्याणकर, गुंडू ढोणे, प्रेमनाथ सरवदे, माणिक कांबळे, धोंडिराम गुगळगावे, बाबूराव जकेकुरे, गुंडू पाटील, मारुती गायकवाड, यादव बिराजदार, गोविंद आलमले, नागनाथ दळवे, बाबूराव पांचाळ, राम सुरवसे, दत्तात्रय बिराजदार, प्रेमनाथ सरवदे आदींचा सन्मान यावेळी सरपंच आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गजेंद्र पाटील, राम घोटमाळे, सुधाकर सुर्यवंशी, महादेव घंटे, चंद्रकांत बलसुरे यांच्यासह शेतकरी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी गुरव, कृषीमित्र गहिनीनाथ बिराजदार, विठ्ठल दासमे यांनी सहकार्य केले.