वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील कोराळ गावास जलजिवन मिशन योजने अंतर्गत ९८ लाख ९५ हजार निधी मंजूर झाला आहे. याअंतर्गत १ लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी, विंधन विहीर, मुख्य पाईप लाईन व गाव अंतर्गत पाईप लाईन करण्यात येणार आहे. या कामाचे भुमिपुजन समारंभ कोराळ येथील हनुमान मंदिर येथे शनिवारी (दि. २९) सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेशदाजी बिराजदार यांच्या शुभहस्ते व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कु. सक्षणाताई सलगर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा समारंभ होणार आहे.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, जिल्हा उपाध्यक्ष भिमा स्वामी, सिनेट मेंबर संजय निंबाळकर, काँग्रेस पक्षाचे उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे, उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, उमरगा तालुकाध्यक्ष संजय पवार, लोहारा तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमरगा व लोहारा तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच विष्णू चंद्रकांत भगत यांनी केले आहे.