उमरगा प्रतिनिधी –
ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच, सदस्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे महिलांनी सक्रिय होऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेऊन काम करावे. ग्रामपंचायतींच्या कारभारातून पतींचा हस्तक्षेप बंद करुन स्वतः विकास कामांसाठी वेळ देत कारभार सांभाळावा. महिलांनी पुढाकार घेतल्यास भ्रष्टाचार होणार नाही व विकासकामे सुद्धा उत्कृष्ट दर्जाचे होतील असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
उमरगा व लोहारा तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत विजयी झालेले सरपंच व सदस्यांचा सोमवारी (दि.२६) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी उमरगा तालुकाध्यक्ष संजय पवार, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी, उमरगा युवक तालुकाध्यक्ष शमशोद्दीन जमादार, शहराध्यक्ष ख्वाजा मुजावर, मुरूमचे शहराध्यक्ष प्रा. दत्ता इंगळे, गोविंदराव साळुंके, तालुका सरचिटणीस धीरज बेळंबकर, महिला जिल्हा उपाध्यक्ष सुनीता पावशेरे, महिला उपाध्यक्ष भाग्यश्री रणदिवे, संगीता सलगर, सविता पवार, हाजी सय्यद, अफसर मुल्ला, विष्णू भगत, अजित पाटील उपस्थित होते. यावेळी प्रा. दत्ता इंगळे, बाबा जाफरी यांनीही मनोगत व्यक्त केले. जगदीश सुरवसे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. शमशोद्दीन जमादार यांनी आभार मानले.
या गावातील सरपंच, सदस्यांचा सत्कार
सरपंच मंजुषा सगर (कोराळ), उषा बिराजदार (चिंचोली भुयार), सुशील कुमार जाधव (औराद), विद्याताई ब्याळे (चिंचोली ज), महादेव कांबळे (कलदेव निंबाळा), पद्माकर कुन्हाळे (एकुरगा), शाहूराज जाधव (महालिंगरायवाडी), लोहारा तालुक्यातील भाग्यश्री पाटील (सालेगाव), दिलीप वाघमारे (उंडरगाव), यांच्यासह विजयी झालेल्या केसरजवळगा, आलूर, सास्तुर, येनेगुर आदी गावातील नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात नूतन विविध सेवा सोसायटीचे चेअरमन प्रताप मोहिते (व्हंताळ), डॉ. राम जाधव (कदेर) यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.