राष्ट्रवादी काँग्रेसच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी महेंद्र (काका) धुरगुडे यांची निवड करण्यात आली आहे. बुधवारी (दि.१९) मुंबई येथील कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते महेंद्र धुरगुडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, शिक्षक आमदार विक्रम काळे, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उमरगा तालुकाध्यक्ष शमशोद्दीन जमादार आदी उपस्थित होते.