वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
परमिट रूम चे लायसन्स मिळणेसाठी चारित्र्य पडताळणी करून स्पॉट पाहणी अहवाल विनात्रुटी सादर करण्यासाठी पंचेविस हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी भूम पोलीस ठाण्याच्या पोलीस नाईकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.७) गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचे भावाचे बिअर बार परमिट रूमचे लायसन्स मिळणेकामी चारित्र्य पडताळणी करून स्पॉट पाहणी अहवाल विनात्रुटी पोलीस उप अधीक्षक, भूम यांना सादर करणेकामी गणेश रमाकांत देशपांडे ,पोलीस नाईक /1401, पोलीस ठाणे भूम, ज़ि. उस्मानाबाद यांनी तक्रारदार यांना पोलीस निरीक्षक सुरवसे यांच्यासाठी 20000/- रुपये लाच रक्कमेची व स्वतःसाठी 5000/- रुपये लाच रक्कमेची अशी एकूण 25000/- रुपये लाच रकमेची मागणी ११.७.२०२२ रोजी पंचासमक्ष केली. याप्रकरणी त्या पोलीस नाईकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.७) कारवाई केली आहे. या पथकात सापळा अधिकारी विकास राठोड यांच्यासह पोलीस अंमलदार इफतेकर शेख, अर्जुन मारकड, विष्णू बेळे, सचिन शेवाळे, विशाल डोके, चालक दत्तात्रय करडे आदींचा समावेश होता.