वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनामुळे आत्तापर्यंत तालुक्यात एकूण ३० जणांचा मृत्यू झाला आहे.
मागील तीन महिन्यात कमी झालेला कोरोना प्रादुर्भाव मार्च महिन्यापासून वाढला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच मृत्यूची संख्या ही वाढत चालली आहे. तालुक्यातील चिंचोली काटे येथील ९४ वर्षीय पुरुषाची रॅपिड अँटीजन टेस्ट दि. २ एप्रिल ला पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान गुरुवारी ( दि. ८) त्यांचा मृत्यू झाला. तालुक्यातील माकणी येथील ८० वर्षीय पुरुषाची रॅपिड अँटीजन टेस्ट दि. ८ एप्रिल ला पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे गुरुवारी ( दि. ८) त्यांचा मृत्यू झाला. तालुक्यातील जेवळी (दक्षिण) येथील ५१ वर्षीय पुरुषाची आरटीपीसीआर चाचणी दि. २७ मार्चला पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर सोलापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी ( दि. ९) त्यांचा मृत्यू झाला. यामुळे तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३० झाली आहे. सध्या आरोग्य विभागाकडून कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण सुरू आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घालणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.