वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कानेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नामदेव लोभे यांची तर उपसरपंच पदी आशा सुभाष कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे.
लोहारा तालुक्यातील कानेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी सोमवारी ( दि. ८) ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी पीठासन अधिकारी म्हणून के.डी. निंबाळकर उपस्थित होते. या सभेसाठी ग्रामविकास अधिकारी एम.एस. भिल्ल, तलाठी गलांडे उपस्थित होते. यावेळी सरपंच पदासाठी नामदेव लोभे यांनी तर उपसरपंच पदासाठी आशा सुभाष कदम यांनी अर्ज दाखल केले. सरपंच, उपसरपंच पदासाठी एक एक अर्ज दाखल झाल्याने सरपंचपदी नामदेव लोभे यांची तर उपसरपंचपदी आशा सुभाष कदम बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. या सभेसाठी ग्रामपंचायत सदस्य बालाजी लोभे, नवनाथ भारती, यशवंत माने, बाळू हिडोळे, बाळू क्षीरसागर, वंदना चंद्रकात कदम, शंकुतला हरी कदम, सुप्रिया नारायण आडसूळे, लैला धनराज कांबळे, सुनिता बळवंत कांबळे, सावित्रीबाई दशरथ श्रीगीरे उपस्थित होते. यावेळी लिंबराज कदम पाटील, नितीन कदम, अनिल कदम, बळवंत जगताप, दिलीप कदम, शिवाजी कदम, प्रताप कदम, करीम इनामदार, गुडूपाशा शेख, ज्ञानेश्वर लोभे, बाबा कदम, राजेंद्र लोभे, बालाजी कदम, नारायण लोभे, विवेक बनसोडे आदींसह नागरिक उपस्थित होते.