वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील जेवळी येथे स्वयंम शिक्षण प्रयोग या संस्थेअंतर्गत उस्मानाबाद जिल्हा व लातूर जिल्ह्यातील गावांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले.
स्वयंम शिक्षण प्रयोग या संस्थेअंतर्गत घेण्यात आलेल्या या ऑनलाइन प्रशिक्षणात जवळपास ३५० गावकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या प्रशिक्षणाचे सुत्रसंचालन अंजना साबळे यांनी केले. या प्रशिक्षणा दरम्यान स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेचे बाळासाहेब काळदाते यांनी कोरोना विषयी मार्गदर्शन केले. मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे व नाक, तोंडाची स्वच्छता राखणे किती महत्वाचे आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच स्वयंम शिक्षण प्रयोगचे माधव गोरकट्टे यांनी शेतीविषयक सविस्तर माहिती दिली. तसेच कमी खर्चाची शेती करण्यासाठी बीजप्रक्रिया, लागवड कशा पद्धतीने करावी, उगवण क्षमता पाहणे, गांडूळ खताचा वापर याविषयी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयंम शिक्षण प्रयोगच्या शितल रणखांंब, अंजना साबळे, ज्योत्स्ना माने, शिल्पा वलदोडे यांनी विशेष मोलाचे सहकार्य केले.