वार्तादुत – डिजिटल न्युज नेटवर्क
जिल्ह्यातील 40 महसूल मंडळापैकी 15 महसूल मंडळे विमा अग्रीम रकमेसाठी ठरली पात्र ठरली आहेत. त्यातील तुळजापूर तालुक्यातील ७, उमरगा तालुक्यातील ५ तर लोहारा तालुक्यातील ३ महसूल मंडळांचा समावेश आहे. या सर्व महसूल मंडळातील सोयाबीन पिकासाठी अग्रीम रक्कम द्यावी अशी शिफारस जिल्हास्तरीय कमिटीने केली आहे.
दुष्काळ , पावसाचा खंड, अतिवृष्टी, सततचा पाऊस, कीड रोगराई यामुळे पिकाच्या उत्पादनात 50 टक्के पेक्षा अधिक घट होत असेल तर एक जुलै 2022 च्या शासन निर्णय याप्रमाणे 25 टक्के अग्रीम रक्कम देण्याची तरतूद आहे. बुधवारी माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय पिक विमा समितीने ही कार्यवाही केली आहे. गेल्या वर्षीही अग्रीम रक्कम मंजूर केली होती मात्र ती मिळाली नाही. यावर्षी तरी मिळेल अशी आशा धरायला हरकत नाही. मात्र यामुळे पुढील पीक विमा मिळण्यास प्रक्रिया सुलभ होणार आहे.
लोहारा तालुक्यातील माकणी, जेवळी, लोहारा महसूल मंडळे पात्र ठरली आहेत. त्यामुळे संपूर्ण लोहारा तालुक्यात यापुढे पिक विमा मिळण्याच्या प्रक्रिया सुलभ होईल. त्यामुळे संपूर्ण लोहारा तालुका कव्हर झालेला आहे. अतिवृष्टी शंखी गोगलगायच्या मदतीतून लोहारा तालुका वगळल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. हा शेतकरी बांधवांच्या एकजुटीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया अनिल जगताप यांनी दिली आहे.
——-
लोहारा तालुक्यातील तीनही महसूल मंडळाला 25 टक्के अग्रीम रक्कम मंजूर करणे हा शेतकऱ्यांनी दाखवलेला एकजुटीचा विजय आहे. भविष्यात सततचा पाऊस शंकी गोगलगाय कीड रोगाच्या अनुदानासाठी प्रयत्नशील राहू. वेळप्रसंगी रस्त्यावर देखील उतरू.
अनिल जगताप,
माजी जिल्हा उपाध्यक्ष
राष्ट्रवादी युवक काँग्रेस