वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील धानुरी ग्रामपंचायतने महाआवास अभियानामध्ये मराठवाडा विभागातुन द्वितीय क्रमांक पटकावला आहे. शुक्रवारी (दि.३) विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते धानुरी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेमध्ये (ग्रामीण) उकृष्ठ काम करणा-या संस्था व्यक्तीना विभागीय स्तरावरील महाआवास अभियान पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनांमध्ये जास्तीत जास्त घरकुल मंजूर करुन घरकुल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल या पुरस्कारासाठी धानुरी ग्रामपंचायतची निवड करण्यात आली आहे. धानुरी ग्रामपंचायतीने मराठवाडा विभागात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. शुक्रवारी (दि.३) विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते धानुरी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले, धानुरीचे सरपंच प्रविण थोरात, उपसरपंच विठ्ठल बुरटुकणे, माजी सरपंच गणेश जाधव, माजी उपसरपंच संभाजी वडजे, ग्रामपंचायत सदस्य राम पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रदिप जाधव, परमेश्वर साळुंके, संदिपान बनकर, राहुल जाधव, नारायण साळुंके, ग्रामपंचायत लिपीक नेताजी लुटे आदी उपस्थित होते.याच कार्यक्रमात महाआवास अभियानात विभागाअंत्तर्गत राज्यस्तरीय आवास योजनेत औरंगाबाद विभागात लोहारा पंचायत समितीने द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या हस्ते सभापती हेमलता रणखांब, गटविकास अधिकारी सोपान अकेले यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.