वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील जि. प. प्रा. शा. भोसगा शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक एस.के. चिनगुंडे यांनी तयार केलेल्या मॅथ्स क्यु या नवीन गणित विषयाचे अॅप प्ले स्टोअर वर उपलब्ध करून लोकार्पण करण्यात आले. विद्यार्थ्यांना गणित विषय अवघड वाटतो. तो सोपा व्हावा यासाठी केबीसी सारखी विविध घटकावर प्रश्न यात आहेत. या प्रश्नांच्या खाली चार पर्याय देखील दिली आहेत. अशा खेळाच्या स्वरूपात विद्यार्थी गणित विषयाचे अभ्यास करतो व विषय सोपा होतो. या कार्यक्रमावेळी गावातील सरपंच सौ. शशिकला गोसावी, उपसरपंच पंडित पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. रूपाली बुवा, मुख्याध्यापक एम. एम. डोखले, पोलिस पाटील ज्योतीताई हत्तरगे, तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत मानाळे, जिलानी शहा, सुभाष बिराजदार , माणिक बिराजदार, डी.बी. कांबळे, एस. आर. डावरे, एस.के. चिनगुंडे, एस. एस. भोसले आदी उपस्थित होते.