वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील प्रा. आर.एम. खराडे यांना पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
तालुक्यातील माकणी येथील बी.एस.एस. कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक आर. एम. खराडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कला विद्याशाखेत हिंदी विषयासाठी पीएचडी पदवी प्रदान केली आहे. दि. ३१ मार्च ला प्रा. खराडे यांचे मौखिक सादरीकरण ऑनलाइन पद्धतीने झाले. त्यांनी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील प्रोफेसर डॉ. देविदास इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मोहन राकेश और गंगाधर गाडगिल की कहानियों का तुलनात्मक अनुशीलन’ या विषयावर शोध प्रबंध सादर केला.
त्यांच्या या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेश मोरे, सरचिटणीस जनार्दन अण्णा साठे, चिटणीस पद्माकरराव हराळकर, प्राचार्य एच. एन. रेडे, प्राचार्य जी. एच. जाधव तसेच संस्थेच्या दोन्ही वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.