वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बँकेत जाता येत नाही. त्यामुळे गावात जाऊन निराधार, अपंगांच्या पगारी चे वाटप करण्याचा उपक्रम उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे गुरुवारी ( दि. २७) निराधार, अपंगांना पगारीचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना यासह अन्य योजनांच्या लाभार्थ्यांना अनुदान घेण्यासाठी बँकेत जाणे कठीण झाले आहे. हीच अडचण लक्षात घेऊन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी बँक आपल्या दारी हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले. कोरोनाच्या या संकटकाळात लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक शाखांतर्गत येणाऱ्या गावात जाऊन लाभार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन रक्कम देण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत गुरुवारी ( दि. २७) बलसुर शाखेच्या वतीने तालुक्यातील सालेगाव येथे जाऊन निराधारांच्या पगारीचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचे संचालक गोविंद साळुंके, ग्राम पंचायत सदस्य सालेगाव गोपाळ माने, शाखाअधिकारी शिवराज मदने, लिपिक अलीम अत्तार आदींची उपस्थिती होती. सध्या सर्वत्र लॉक डाऊन आहे. अशा परिस्थितीत आमची अडचण दूर करण्यासाठी बँकेच्या वतीने घरपोच रक्कम देण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी बँकेच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. या काळात लाभार्थ्यांना अडचण येऊ नये यासाठी बँक आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून लाभार्थ्यांच्या घरी जाऊन रक्कम देण्यात येत आहे.
सुरेश बिराजदार,
चेअरमन,
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक
——-
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेला बँक आपल्या दारी हा उपक्रम खूप छान आहे. यामुळे लाभार्थ्यांची अडचण दूर होत आहे. या उपक्रमाबद्दल बँकेचे अध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार व बँक प्रशासनाचे आभारी आहोत.
सुनील साळुंके
तालुकाध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
——
ग्रामीण भागात बँकेत जाण्यासाठी सध्या अनेक अडचणी आहेत. या उपक्रमामुळे वृद्ध, निराधार यांना मदत झाली आहे. याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
गोविंदराव साळुंके,
संचालक,
भाऊसाहेब बिराजदार सह साखर कारखाना समुद्राळ
No Result
View All Result
error: Content is protected !!