लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात रविवारी (दि.११) लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व विद्यालयाच्या वतीने पोलीस दलात निवड झालेले युवक व दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष गोविंदराव साळुंके होते. यावेळी संस्थेचे सचिव प्रा. सुरेश बिराजदार, कोषाध्यक्ष दत्तात्रय बिराजदार, संचालक निवृत्ती साळुंके, प्रा. मोहन बडुरे, माधवराव पाटील, बब्रुवान औटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, सरपंच भाग्यश्री पाटील, उपसरपंच हुसेन शेख, महेश भगत, विष्णू भगत, राजेंद्र बिराजदार, प्राचार्य श्नीपाद कुलकर्णी, मुख्याध्यापक सुरेश रोहिणे, उषा गवारे, गुरुलिंग वाकडे, सेवानिवृत्त प्राचार्य जी.एस.देवणे, प्रकाश भगत, राजेंद्र बिराजदार, मनोज देशपांडे, गोपाळ माने, शेखर साळुंके, मंगेश साळुंके, बालाजी जाधव, राहुल चेन्डके, पांडुरंग गुरव, आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात शुभम घोगे, आदर्श भालेराव, सारीका साळुंके, जयश्नी फडणीस, साहील कांबळे, मयुरी पटवारी, बसवराज बिराजदार, तृप्ती कुंभार, वेदांत मसलगे आदीसह पोलीस दलात निवड युवकांचा मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना प्रा. बिराजदार म्हणाले की, जीवनात मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास व काटेकोर नियोजन करणे महत्वाचे आहे. शालेय जीवनातील अभ्यासावर पुढील शैक्षणिक दिशा निश्चित होत असल्याने सर्व विषयाचा अभ्यास चिकित्सक पध्दतीने करावा. यावेळी सुनील साळुंके, गोविंदराव साळुंके आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश रोहिणे यांनी केले. प्रा. परमेश्वर सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन तर परमेश्वर भालेराव यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी गावातील व परिसरातील पालक व विद्यार्थी उपस्थित होते.