वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर गावातील व्यापारी व कर्मचाऱ्यांची शनिवारी ( दि.१२) ग्रामपंचायत मध्ये रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. यावेळी तपासणी करण्यात आलेल्या सर्व ९१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला.
कोविड १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी ग्रामपंचायतीच्या वतीने सास्तुर गावातील व्यापारी व कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. यावेळी एकूण ९१ जणांची तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यासाठी सरपंच यशवंत कासार, जगदीश कुलकर्णी, मारुती दंडगुले, ग्रा.प. कर्मचारी बाबू सुतार, राजेंद्र खडके यांनी परिश्रम घेतले. स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांच्या मार्गदर्शन व सहकार्य लाभले. यादरम्यान तहसीलदार संतोष रुईकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन मार्गदर्शन केले.