Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

कोरोनात आई-वडील गमावलेल्या पाल्यांना शिवसेनेचा आधार – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रति कुटंबाला एक लाख रुपयाची मुदतठेव

by admin
in आरोग्य व शिक्षण
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
युवासेनाप्रमुख तथा पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री मा.ना.आदीत्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा शिवसेनेच्या वतीने कोरोनामुळे अनाथ झालेल्या अठरा वर्षाखालील बालकांचे पालकत्व स्विकारण्याचा निर्णय घेतला. अशा बालकांना तातडीने प्रत्येकी एक लाख रुपयाची आर्थिक मदत केली असुन पाल्यांच्या नावे ही मुदतठेव ठेवण्यात येणार आहे.
रविवारी मा.ना.आदीत्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक स्वरुपात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, उस्मानाबाद नगरीचे नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर, शिवसेना गटनेते तथा नगसेवक सोमनाथ गुरव, शहरप्रमुख संजय (पप्पू) मुंडे, शामराव शिंदे आदींच्या हस्ते मुदत ठेव प्रमाणपत्र देऊन आज सुरवात केली.
कोरोनाच्या काळात अनेक कुटुंबाची हानी झाली आहे, कोणाचे आई तर कोणाचे वडील यामध्ये बळी पडले आहेत. अशा कुटुंबाची झालेली हानी कधीही भरुन येऊ शकत नाहीच. पण त्यातही ज्या पाल्याचे आई-वडील दोघेही मयत झाल्याच्या दुर्देवी घटना घडल्या आहेत त्याने समाजमन हादरुन गेले आहे, अशावेळी त्यांची मुल उघड्यावर पडण्याची भिती होती. शासनाने त्यांना मदतीचा हात देऊन जबाबदारी स्विकारण्याचे महत्वाचे काम केले आहे.\"\"शिवसेनेचे ब्रिद 80 टक्के समाजकारणाचे आहे, त्यामुळे पक्षाच्यावतीनेही त्यांना आधार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशा अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे. शिवसेनेने ही जबाबदारी घेत या मुलांचे पालकत्व स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. युवासेनेचे प्रमुख मा.ना.आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त या प्रत्येक कुटुंबाना एक लाख रुपये मुदत ठेव पाल्यांच्या नावे केली आहे. ही रक्कम त्यांच्या भविष्यासाठी उपयोगी ठरावी म्हणुन मुदतठेव स्वरुपात ठेवण्यात आली आहे. पुढील काळात त्यांच्यासोबत राहुन त्याना आधार देण्यासाठी शिवसेना त्यांच्यासोबत कायमस्वरुपी राहणार आहे.
आई-वडीलांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली ही मोठी पोकळी भरुन काढण्यासाठीचा शिवसेनाचा छोटासा प्रयत्न आहे. त्यांना या काळात साथ देणे हे समाज म्हणुन आपले कर्तव्य आहे, ही सामाजिक जाणीव ठेऊन शिवसेना या कुटुंबासोबत आहे,.समाजातील उपेक्षित घटाकासाठी शिवसेना नेहमीच पुढाकार घेत असते, हा काळ तर आणीबाणीचा आहे. अडचणीच्या काळात शिवसेना कधीच मागे हटत नाही. शिवसेनेचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणुन जबाबदारी पेलतच आहेत. त्यांच्या शिकवणीप्रमाणेच हा निर्णय घेत या पाल्यांचे पालकत्व शिवसेना स्विकारत असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.

Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर गावातील व्यापारी व कर्मचाऱ्यांची तपासणी – सर्वांचे अहवाल निगेटिव्ह

Next Post

उमरगा येथे स्ट्रीट लाईट व हायमस्ट लॅम्प कामाचा शुभारंभ – आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या स्थानिक विकास निधीतून १ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर – माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या हस्ते झाला शुभारंभ

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

Next Post

उमरगा येथे स्ट्रीट लाईट व हायमस्ट लॅम्प कामाचा शुभारंभ - आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या स्थानिक विकास निधीतून १ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर - माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या हस्ते झाला शुभारंभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!