लोहारा / प्रतिनिधी
शिवांश मल्लाडेच्या प्रथम वाढदिवसानिमित्त माकणी येथील मल्लाडे परिवाराचा सामाजिक उपक्रम
———————————————-
दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी माकणी येथील उद्योजक मल्लाडे परिवारातील गणेश मल्लाडे यांचा मुलगा शिवांश मल्लाडेचा प्रथम वाढदिवस निवासी दिव्यांग शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप करून अनोख्या पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. याप्रसंगी १०० किलो तांदूळ, ५० किलो गहू शाळेतील विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी मल्लाडे परिवाराच्या वतीने शाळेस भेट देण्यात आले. तसेच शालोपयोगी साहित्य व स्वादिष्ट भोजन देण्यात आले. याप्रसंगी उद्योजक गणेश दिलीप मल्लाडे, महेश दिलीप मल्लाडे, शिवानी गणेश मल्लाडे, स्वेता महेश मल्लाडे, शिला दिलीप मल्लाडे, साधनाबाई बिदरकर, आदर्श शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी, अंजली चलवाड, प्रविण वाघमोडे, आर. ई. इरलापल्ले, राम बेंबडे, बी.बी.गुणाले, ज्ञानोबा माने, शंकरबुवा गिरी, सुर्यकांत कोरे, डी.एस.सगर, निवृत्ती सुर्यवंशी, निशांत सावंत तसेच दिव्यांग विद्यार्थी आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी गौरीशंकर कलशेट्टी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना निवासी दिव्यांग शाळेच्या कार्याचा गौरव करीत, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सास्तूर निवासी दिव्यांग शाळा ही सर्वांगिण विकासाचे प्रमुख केंद्र बनत आहे. विविध घटकांनी वाढदिवस, पुण्यतिथी इत्यादी कार्यक्रमाच्या निमित्ताने या शाळेच्या कार्यास मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे असे मत व्यक्त केले.
शाळेतील दिव्यांग विद्यार्थी गौरव करदोरेच्या प्रामाणिकपणाच होतय कौतुक
मल्लाडे परिवाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात त्यांचा मुलगा शिवांश याच्या हातातील सोन्याची अंगठी कार्यक्रमादरम्यान हरवली असता मल्लाडे परिवारातील सदस्यांनी व शाळेतील कर्मचा-यांनी शोधाशोध करूनही अंगठी सापडली नाही. मल्लाडे परिवारातील सर्व सदस्य शाळेतील विद्यार्थी व कर्मचा-यांचा निरोप घेऊन शाळेसमोरील प्रांगणातून निघत असताना, गौरव गोविंद करदोरे हा इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेला शाळेतील दिव्यांग विद्यार्थी हरवलेली अंगठी घेऊन मल्लाडे परिवारातील सदस्यांकडे आला. व त्याने हरवलेली अंगठी शोधून मल्लाडे परिवाराकडे सूपूर्द केली. या दिव्यांग विद्यार्थ्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वांनी कौतुक केले. सास्तूर निवासी दिव्यांग शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी संस्कार मुल्ये रुजवली जात असल्याचे पाहून उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.