वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बुधवारी ( दि. २१) प्राप्त अहवालानुसार तालुक्यात रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये १९ तर आरटीपीसीआर चाचणीमध्ये १८ असे एकूण ३७ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
लोहारा तालुक्यात मागील काही महिन्यांपूर्वी कोरोनाचे तुरळक रुग्ण आढळून येत होते. परंतु मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बुधवारी ( दि. २१) प्राप्त अहवालानुसार तालुक्यात एकूण ३७ रुग्णांची भर पडली आहे. यामुळे तालुक्यात दि. २१ अखेर एकूण २७२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी शहरात ५४ तर ग्रामीण भागातील २१८ रुग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत तालुक्यात एकूण ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तालुक्यात एकूण १३७५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी १०७१ जण बरे होऊन घरी गेले आहेत.
लोहारा तालुक्यात बुधवारी ( दि. २१) प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण ३७ रुग्णांची भर पडली आहे. त्यात रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील ३, तावशीगड ४, माकणी ४, सास्तूर १, करजगाव १, धानुरी १, लोहारा २, भातागळी १, अचलेर १, तोरंबा १ असे एकूण १९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर आरटीपीसीआर चाचणी मध्ये लोहारा ३, हिप्परगा (रवा) १, माकणी २, धानुरी १, मार्डी १, काटेचिंचोली १, सास्तूर १, जेवळी १, आष्टाकासार ७ असे एकूण १८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. एकूणच परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेणे, स्वतःची व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेणे, अनावश्यक घराबाहेर न पडणे, प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.