वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मंगळवारी ( दि. २५) प्राप्त अहवालानुसार तालुक्यात रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये ५७ तर आरटीपीसीआर चाचणीमध्ये ३३ असे एकूण ९० जण पॉझिटिव्ह आले आहेत.
लोहारा तालुक्यात मागील काही महिन्यांपूर्वी कोरोनाचे तुरळक रुग्ण आढळून येत होते. परंतु मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मंगळवारी ( दि. २५) प्राप्त अहवालानुसार तालुक्यात एकूण ९० रुग्णांची भर पडली आहे.
त्यात रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये तालुक्यातील नागूर २८, सास्तुर ४, जेवळी १, मुर्शदपूर १, मोघा १, काटे चिंचेली १, लोहारा २, हिप्परगा ११, माकणी १, कास्ती (बू) १, वडगाव १, खेड २, धानुरी २, कानेगाव १ असे एकूण ५७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर आरटीपीसीआर चाचणीमध्ये लोहारा १०, धानुरी २, नागूर १, कानेगाव १, नागराळ १, मार्डी १, शिवकरवाडी २, जेवळी प. तांडा ५, वडगाव १, खेड १, अचलेर २, मोघा १, जेवळी २, रूद्रवाडी ३ असे एकूण ३३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. एकूणच परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेणे, स्वतःची व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेणे, अनावश्यक घराबाहेर न पडणे, प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
No Result
View All Result
error: Content is protected !!