वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायतवर शिवसेनेची सत्ता स्थापन होणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले. लोहारा नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सोमवारी (दि.२२) लोहारा शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार चौगुले बोलत होते.यावेळी पुढे बोलताना आमदार चौगुले म्हणाले की, लोहारा शहरांतर्गत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी मागील पाच वर्षाच्या काळात जिल्हा वार्षिक योजनेच्या व महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून भरघोस निधी मंजूर करून घेऊन विकास कामे पूर्ण केली. सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचे, नगर विकास मंत्री शिवसेनेचे, पालकमंत्री शिवसेनेचे, स्थानिक खासदार शिवसेनेचे, आमदार शिवसेनेचे असल्याने शहराच्या उर्वरित भागाचा विकास करण्यासाठी आणखीन भरघोस असा निधी मंजूर करून घेऊ शकतो. याकरिता नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेची सत्ता स्थापन होणे गरजेचे आहे. याकरिता शिवसैनिकांनी एक दिलाने एकसंघ राहून आपले कार्य जनतेपर्यंत पोहोचवल्यास लोहारा नगरपंचायतवर शिवसेनेचा भगवा निश्चितपणे फडकेल तसेच या पुढील काळात गद्दारांना शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील अशी ग्वाही आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली.या बैठकीसाठी तालुकाप्रमुख मोहन पनुरे, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, उपतालुकाप्रमुख जगन पाटील, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, शहरप्रमुख सलीम शेख, अभिमान खराडे, अविनाश माळी, महेबूब गवंडी, विजय फावडे, श्याम नारायणकर, प्रमोद बंगले, महेबूब फकीर, अतिक पठाण, प्रताप घोडके, भरत सुतार, श्रीकांत भरारे, हमीद पठाण, उमर पठाण, जनक कोकणे, बाळासाहेब कोरे, ओम कोरे, आमीन सुंबेकर, बळी रोडगे, दिपक रोडगे, कुर्बान खूटेपड, सतीश माळी, नितीन वाघ, संदीप माळी, प्रशांत काळे, मधुकर भरारे, शिवाजी सुतार, तानाजी घोडके, गौस मोमिन, श्रीशैल स्वामी, शिवहार नारायणकर, मोहम्मद हिप्परगे, गणेश विरुदे, अमोल माळी, गोटू माळवदकर आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.