Vartadoot
Wednesday, July 8, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

जिल्हा परिषद शिक्षक अनिल अर्जुने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

मुख्य संपादक by मुख्य संपादक
04/04/2026
in लोहारा तालुका
A A
0
जिल्हा परिषद शिक्षक अनिल अर्जुने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
Ad 10

ध्येय एज्युकेशन फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य), एज्युकेशन आयकॉन्स समिट यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक अनिल पुंडलिकराव अर्जुने यांना राष्ट्रपती पुरस्कार विजेते वारे गुरुजी यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य ध्येय एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुदाम शेंडगे होते. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते दत्तात्रय वारे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या उपमहापौर शर्मिला बाबर, छत्रपती संभाजीनगरचे उपजिल्हाधिकारी शुभम पवार, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दक्षिण जेवळी येथील शिक्षक अनिल पुंडलिकराव अर्जुने यांना २०२५ चा ध्येय एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेली अविरत धडपड, शैक्षणिक उपक्रमातील नवीनता व समाजातील आपले प्रभावी योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन ही नामांकित संस्था असून तिचे कार्य महाराष्ट्राबरोबर संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक ठरत आहे. हा सन्मान सोहळा पिंपरी चिंचवड येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात घेण्यात आला. राष्ट्रपती पुरस्कार विजेते वारे गुरूजी यांच्या हस्ते अनिल पुंडलिकराव अर्जुने यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी शिक्षिका अश्विनी अर्जुने, शिक्षक रजनीकांत तुपारे, अवनी अर्जुने, आरोही अर्जुने यांच्यासह ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.


शिक्षक अनिल पुंडलिकराव अर्जुने यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल शालेय समितीचे अध्यक्ष भिमाशंकर साखरे यांनी विद्यार्थी पालक संघाच्या बैठकीत त्यांचा सत्कार केला. यावेळी ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष शिवराज चिनगुंडे व माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम.एम. डोखले होते. यावेळी लोहारा मंडळाचे कृषी पर्यवेक्षक रवी बनजगोळे, पत्रकार बसवराज होनाजे, शालेय समितीचे उपाध्यक्ष बालाजी चव्हाण, सदस्य शंकर किर्तने, नवनाथ गुंजोटे, बळीराम बोंदाडे, शरणप्पा गुंजोटे, गौरीशंकर स्वामी, हेमंत भैराप्पा, शाळेतील शिक्षक शंकर कोराळे, श्रीशैल्य कोळी, सचिन चौगुले, श्रीमती अश्विनी अर्जुने, श्रीमती सविता ननवरे उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आदर्श शिक्षक पुरस्कारजेवळी
Previous Post

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – लोहाऱ्यात दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

Next Post

खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट

Related Posts

आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

07/07/2026
हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार

05/07/2026
लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

03/07/2026
तावशीगड येथील धीरज बिराजदार याने पटकावले सुवर्णपदक
लोहारा तालुका

तावशीगड येथील धीरज बिराजदार याने पटकावले सुवर्णपदक

28/06/2026
शिक्षिका सुप्रिया माळवदकर यांना विनोबा अँपचा पोस्ट ऑफ द मंथ पुरस्कार
लोहारा तालुका

शिक्षिका सुप्रिया माळवदकर यांना विनोबा अँपचा पोस्ट ऑफ द मंथ पुरस्कार

27/06/2026
किर्ती चव्हाण यांची भारतीय रेल्वेत तिकीट क्लर्कपदी निवड
लोहारा तालुका

किर्ती चव्हाण यांची भारतीय रेल्वेत तिकीट क्लर्कपदी निवड

27/06/2026
Next Post
खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट

खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's