Vartadoot
Saturday, August 22, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट

मुख्य संपादक by मुख्य संपादक
06/04/2026
in लोहारा तालुका
A A
0
खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट
Ad 10

लोहारा शहरातील शिवप्रसाद भवन येथे कार्यरत ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शनिवारी (दि.४) सदिच्छा भेट देत केंद्रातील शांत, पवित्र व आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला.
यावेळी केंद्राच्या संचालिका सरिता दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या विविध आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती खासदार निंबाळकर यांनी जाणून घेतली. ब्रह्मकुमारीज संस्थेमार्फत ध्यानसाधना, राजयोग मेडिटेशन, आत्मशांती, सकारात्मक विचारसरणी तसेच संस्कारयुक्त जीवनपद्धतीचा संदेश समाजापर्यंत सातत्याने पोहोचविण्याचे कार्य केले जात असल्याचे त्यांनी पाहिले. यावेळी बोलताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की, “आजच्या धावपळीच्या व तणावपूर्ण जीवनशैलीत मानसिक शांतता आणि सकारात्मक विचारांची अत्यंत गरज आहे. ब्रह्मकुमारीज संस्था समाजामध्ये नैतिक मूल्ये, बंधुभाव आणि आध्यात्मिक जागृती निर्माण करण्याचे अत्यंत मोलाचे कार्य करत आहे. युवक व महिलांना योग्य जीवनदृष्टी देऊन व्यसनमुक्त आणि सुसंस्कारित समाज घडविण्यात अशा केंद्रांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.”


तसेच “स्वतःमध्ये बदल घडवा आणि समाज परिवर्तन घडवा” हा संदेश देत संस्था मानवतेची व शांततेची ज्योत अखंड प्रज्वलित ठेवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी युवक, महिला व सर्वसामान्य नागरिकांना सकारात्मक जीवनदृष्टी देणे, व्यसनमुक्ती, नैतिकता व शांततामय सहजीवनाचा मार्ग दाखविण्याचे कार्य प्रत्यक्ष पाहून उपस्थितांना प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. अशा आध्यात्मिक केंद्रांमुळे समाज अधिक सुसंस्कृत, संयमी व सशक्त बनण्यास निश्चितच मदत होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या भेटीदरम्यान खासदार निंबाळकर यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या सेवाभावी कार्याचे मनापासून कौतुक केले. यावेळी बाळासाहेब पाटील, अमोल बिराजदार, सुधीर घोडके, पंडित बारगळ, शेखर पाटील, सचिन रसाळ, दीपक पोतदार, राजू स्वामी, राजेंद्र सूर्यवंशी, विजयकुमार बडडाळे, प्रेम लांडगे, मधुकर सुरवसे, राम माने, आकाश विरोधे, सुग्रीव माळी, दिलीप सुरवसे, अविनाश भाई, राणी बहिणजी आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: खासदार ओमराजे निंबाळकरलोहारा
Previous Post

जिल्हा परिषद शिक्षक अनिल अर्जुने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Next Post

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

Related Posts

होळी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत बाल आरोग्य तपासणी शिबिर
लोहारा तालुका

होळी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत बाल आरोग्य तपासणी शिबिर

22/08/2026
लोहारा तहसिल कार्यालयासमोर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन
लोहारा तालुका

लोहारा तहसिल कार्यालयासमोर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन

19/08/2026
लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याचे मिल रोलर पुजन
लोहारा तालुका

लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याचे मिल रोलर पुजन

19/08/2026
डॉ. धनाजी थोरे यांना राज्यस्तरीय ‘राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’
लोहारा तालुका

डॉ. धनाजी थोरे यांना राज्यस्तरीय ‘राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’

19/08/2026
एकोंडी (लो) शाळेतील रुद्र सूर्यवंशी याची नासा परीक्षेसाठी निवड
लोहारा तालुका

एकोंडी (लो) शाळेतील रुद्र सूर्यवंशी याची नासा परीक्षेसाठी निवड

18/08/2026
माकणी येथे ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

माकणी येथे ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

16/08/2026
Next Post
थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's