वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील ग्रामीण रुग्णालयात बुधवारी (दि.१५) आरोग्य विभाग, जि.प. उस्मानाबाद व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य मेळावा घेण्यात आला. यात ३६४ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे होत्या. उपनगराध्यक्ष आयुब शेख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक जालिंदर कोकणे, आमीन सुंबेकर, विजय ढगे, के. डी. पाटील, दीपक रोडगे, श्रीकांत भरारे, बाळासाहेब पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोविंद साठे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर ढोले, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक डॉ. हेड्डे, सतीश गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या आरोग्य मेळाव्यात बालरोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी, नेत्र रोग तपासणी, प्रयोगशाळा तपासणी व इतर सर्व आजारांची तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. मेटे, डॉ. करजखेडे, डॉ. सुप्रिया तनपुरे, डॉ. पल्लवी गायकवाड, डॉ. दीपाली शिंदे, डॉ. कोमल मगर, डॉ. सुवर्णा जाधव, डॉ. इरफान शेख, डॉ. राजू गायकवाड, डॉ. अमोल सूर्यवंशी, डॉ. रणजित जाधव, डॉ. विक्रम देशमुख, श्री. मुजावर आदींनी एकूण ३६४ रुग्णाची तपासणी केली. या आरोग्य मेळाव्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व ग्रामीण रुग्णालय लोहारा येथील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गिरी यांनी तर श्री. मुजावर यांनी आभार मानले.