वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. साक्षी दिपक गिल्डा (इयत्ता अकरावी विज्ञान ) हीची एकोणीस वर्षीय वयोगटातील मुलींच्या कबड्डी संघात निवड झाली आहे. दिनांक ९ मार्च २०२१ रोजी कर्नाळा अँकडमी, पनवेल येथे निवड चाचणी होणार आहे. या चाचणीत तिची निवड झाली तर भारतीय संघात तिची निवड होऊ शकते. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बलभीम महाविद्यालय बीडचे उपप्राचार्य प्रा. डॉ. संतोष उंदरे ( उपप्राचार्य – बलभीम महा.बीड.) प्रा.विरभद्र स्वामी, प्रा. यशवंत चंदनशिवे, कबड्डी प्रशिक्षक विवेकानंद क्षिरसागर, प्रा. शिवाजी जाधव, महादेव कदम , प्रा. रत्नमाला पवार, प्रा. पल्लवी कल्लशेट्टी, प्रा. अनिता पवार, प्रा. राहुल मोरे, प्रा. अभिजित सपाटे, प्रा. सुनंदा सुर्यवंशी, प्रा. स्नेहल करदुरे, प्रा. माने मँडम यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.