वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील शिव मित्र मंडळ यांच्या वतीने व युवासेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या सौजन्याने लोहारा शहरातील शिवनगर व प्रभाग क्र. ६ मधील नागरिकांना स्टीमर वाटपाचा शुभारंभ सोमवारी ( दि. २६) करण्यात आला.
सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेणे, प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करणे एवढेच आपल्या हातात आहे. कोरोना या विषाणूपासून बचाव करण्यासाठी वाफ घेणे हा एक पर्याय असल्याचे अनेकांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांना घरात वाफ घेता यावी यासाठी लोहारा येथील शिव मित्र मंडळ यांच्या वतीने व युवासेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या सौजन्याने लोहारा शहरातील शिवनगर व प्रभाग क्र. ६ मधील नागरिकांना मोफत स्टीमर वाटपाचा शुभारंभ तहसीलदार संतोष रुईकर यांच्या हस्ते सोमवारी (दि. २६) करण्यात आला.
यावेळी लोहारा नगरपंचायतचे मुख्याधिकारी गजानन शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, शिवसेनेचे लोहारा शहरप्रमुख सलिम शेख, माजी ग्रामपंचायत सदस्य महेबूब गवंडी, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, रघुवीर घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी स्टीमरचा वापर कसा करायचा, वाफ घेतल्याने त्याचा काय परिणाम होतो याविषयी माहिती सांगितली. तसेच सध्या कोरोनापासून बचावासाठी लसीकरण सुरू आहे. दि. १ मे पासून१८ वर्षांच्या पुढील नागरिकांसाठी लसीकरण होणार आहे. त्यामुळे सर्वांनी लस घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
तसेच उपस्थित महिलांनी लसीबद्दल असलेले गैरसमज बोलून दाखविले. त्यावर डॉ कटारे यांनी लसीबद्दल योग्य ती माहिती दिली व त्यांचे गैरसमज दूर केले. मधुकर भरारे, दत्ता मोरे, यावेळी मंडळाचे अध्यक्ष बालाजी बिराजदार, राजेंद्र माळी, राम चपळे, किरण पाटिल, कमलाकर मुळे, बजरंग माळी, शंकर साखरे, अंकुश चपळे, महेश बसु पाटिल, महेश बाळु पाटिल, किशोर क्षिरसागर, ओमकार बिराजदार, सुरज माळी, विक्रम माळी, शिवकुमार बिराजदार आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.